Tuesday 6 December 2016

गेटवे आॅफ इंडिया - भारताचे प्रवेशद्वार

- By Uma Kabe

१९११ मध्ये इंग्लंडचे राजे पंचम जाॅर्ज राणी मेरी यांच्यासह भारताचा दौरा करण्यासाठी मुंबई बंदरात आले. त्याची आठवण म्हणून ही भव्य वास्तू उभारण्याचे काम सुरू झाले. हे काम १९२४ साली पूर्ण होऊन ४ डिसेंबर १९२४ रोजी ही वास्तू जनतेसाठी खुली झाली.

इंडो-सारसेनिक वास्तु रचनेच्या पद्धतीच्या गेटवेचे वास्तुरचनाकार जाॅर्ज विटेट होते.

एका बाजूला विशाल अरबी समुद्र, दुसरीकडे मुंबईची ऐतिहासिक गोदी तर तिसरीकडे जगप्रसिद्ध ताज महाल हाॅटेल यांच्या मधोमध वसलेला गेटवे, पर्यटकांचे मुंबईतील महत्त्वाचे आकर्षण स्थळ आहे. कदाचित त्यामुळेच इथे नजीकच्या भूतकाळात २००३ व २००८ मध्ये अतिरेक्यांचे हल्ले झाले .

१९२४ मध्ये गेटवे उभारल्यानंतर त्याच्या भव्य कमानींखालीच भारतात येणारे नवे गव्हर्नर्स व हाईसराॅय यांचे स्वागत होत असे.

याच गेटवेने २७ मे १९४८ला ब्रिटिश सैन्याच्या शेवटच्या तुकडीला - साॅमरसेट लाईट इन्फन्ट्रीला निरोप दिला व ब्रिटिश साम्राज्यशाहीचे अस्तित्व संपवले.

असा हा गेटवे आॅफ इंडिया ! त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया !

















































Images provided by Uma Kabe, Image source: unknown

1 comment:


  1. sell your k i d n e y for money, we are looking for k i d n e y d0n0rs with the sum of $500,000.00 USD,at global hospitals group india apply now via email:onlinecareunit@gmail.com


    ReplyDelete